घरताज्या घडामोडीMumbai Corona Update : दिलासादायक ! मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत शून्य मृत्यूची...

Mumbai Corona Update : दिलासादायक ! मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत शून्य मृत्यूची नोंद

Subscribe

राज्यासह मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील मृत्यूचा आकडा शून्यच आहे. फेब्रुवारी महिन्यात काल(सोमवार) नवव्यांदा शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच मुंबईत शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील २४ तासांत ७७ नव्या कोरोनाबधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत मुंबईतील मृत्यूदर शून्यावर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील २४ तासांत ७७ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली असून १३५ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूचे एकूण ७५७ रूग्ण सक्रिय आहेत. तर दुप्पटीचा दर ५ हजार २७९ दिवस इतका आहे. त्याचप्रमाणे कोविड वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे. रूग्णालयात आज एकूण १५ रूग्ण दाखल झाले आहेत. तर ऑक्सिजन बेडवरील रूग्णांची संख्या ४ आहे.

- Advertisement -

मुंबईतील एसिम्प्टोमॅटीक रूग्णांची संख्या ६२ इतकी असून ७४१,१८२ इतका प्रगतीपर अहवाल आहे. मुंबईत कोरोना रूग्णांच्या एकूण १६ हजार २७७ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे.

- Advertisement -

मुंबईत २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेडची एकूण संख्या ११ हजारांच्या वर गेली आहे. दरम्यान, मुंबईत काल(सोमवार) २४ तासांत ७३ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत एकूण १२ हजार १४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. कालच्या तुलनेत आज चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.


हेही वाचा : Kedarnath Dham : महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांसाठी खुशखबर! केदारनाथ, बद्रिनाथ मंदिराचे या दिवशी उघडणार दरवाजे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -