Corona: राज्यात २४ तासांत ७७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू!

4 deaths and 30 police corona positive found in 24 hours in maharashtra
Corona: राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा मृत्यू, ३० जणांना कोरोनाची बाधा!

राज्यात २४ तासांत ७७ नव्या कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची नोंद झाली असून एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या एकूण १ हजार १५ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६० पोलिसांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पोलीस दलात सतत नव्या कोरोनाबाधित पोलीस संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या संकटात पोलिसांना सातत्याने ड्युटी करावी लागत आहे. मागील २४ तासांत ७७ नव्या कोरोनाबाधितांची पोलिसांची वाढ झाल्याने महाराष्ट्र पोलीस दलाच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात काल ४ हजार ८७८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २४५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७४ हजार ७६१वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ७ हजार ८५५ मृत्यू झाला आहे. आहे. दरम्यान देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ८७ हजार पार झाला आहे. तर यापैकी आतापर्यंत १७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे ३ लाख ४८ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २ लाख २० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – महाराष्ट्रातील ५० टक्के रेस्टॉरंट्सला टाळे लागणार