घरदेश-विदेशCorona: नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या यात्रेकरूंपैकी ७९५ लोकं पॉझिटिव्ह

Corona: नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या यात्रेकरूंपैकी ७९५ लोकं पॉझिटिव्ह

Subscribe

तब्बल ७९५ जण कोरोनाग्रस्त निघाल्याने पंजाब सरकार खडबडून जागं झालं असून, नांदेड प्रशासन देखील हादरलं आहे.

एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाऊन असल्याने नांदेडमध्येच अडकून पडले होते. या सर्व यात्रेकरूंना काही दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी आपल्या गावी पाठवण्यात आले होते. मात्र, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी ७९५ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नांदेडमधून समोर येत आहे. तब्बल ७९५ जण कोरोनाग्रस्त निघाल्याने पंजाब सरकार खडबडून जागं झालं असून, नांदेड प्रशासन देखील हादरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे यात्रेकरू साधारण महिनाभर नांदेडमध्ये मुक्काम करून होते.

यात्रेकरूंची चाचणी न केल्यानं धक्कादायक आकडा समोर

मिळालेल्या माहितीनुसार, होला मोहल्ला या कार्यक्रमासाठी पंजाब पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्याने हे सर्व भाविक गेल्या ४० दिवसांपासून त्या ठिकाणीच अडकून पडल्याने त्यांनी तिथेच मु्क्काम देखील केला होता. या यात्रेकरूंना परत नेण्यासाठी पंजाब सरकारतर्फे प्रयत्न करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्रयत्नांना केंद्राने परवानगी दिली होती. या मिळालेल्या परवानगीनंतर पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सच्या साधारण १३ गाड्यांमधून १७०० लोकांना घरी सोडण्यात आलं. त्यानंतर टप्याटप्यानं इतरही यात्रेकरूंना पंजाब सरकारकडून परत नेण्यात आलं. मात्र, या यात्रेकरूंना घेऊन जाण्यापुर्वी त्यांची कोरोना चाचणी न केल्यानं आता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

यात्रेकरूंच्या तपासणीनंतर ७९५ जणं पॉझिटिव्ह

८० ट्रॅव्हल्सच्या मदतीनं ४ हजार नागरिकांना पंजाब सरकारतर्फे परत राज्यात नेण्यात आलं होतं. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. यानंतर तब्बल ७९५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. २८ एप्रिल रोजी पंजाबमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१० पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्णांची वाढ झाल्यानं पंजाबमध्ये या रुग्णांची १ हजार २३२ वर पोहोचली आहे.


आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये त्रुटी, ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात; फ्रेंच हॅकरचा दावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -