घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे २०० रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे २०० रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे २०० रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील माहिती न्यूज एजन्सी पीटीआयने दिली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकर मायकोसिस हा बुर्शीजन्य गंभीर आजार होत आहे. गुजरातमध्ये ५०० कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस, २० जणांचे डोळे निकामी, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या आजाराचे रुग्ण आता महाराष्ट्रात देखील आढळू लागल्याने चिंता वाढली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसंच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना विविध आजार होत असताना आता म्युकर मायकोसिस हा बुर्शीजन्य गंभीर आजार समोर आला आहे. याचे रुग्ण आधी महाराष्ट्रा बाहेर आढळले होते. दरम्यान, आता महाराष्ट्रात देखील या आजाराचे रुग्ण आढळल्याची माहिती न्यूज एजन्सी पीटीआयने दिली आहे.

- Advertisement -

ज्यांना मधूमेह आहे आणि कोरोना होऊन गेला, त्यांना या आजाराचा जास्त धोका आहे. अनियंत्रित मधुमेहींमध्ये शरीरातील साखरेची पातळी कमी होते. यामध्ये अ‍ॅसिडची पातळीही कमी होते. ही स्थिती बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये ‘म्युकर मायकोसिस’ हा बुरशीजन्य संसर्ग आढळतो.

- Advertisement -

लक्षणे

  • म्युकरमायकोसिस झाल्यास चेहऱ्यावर वेदना होतात तसंच डोकं दुखतं.
  • डोळ्यांच्या आजुबाजूचा भाग सुजतो व तेथे वेदना होतात.
  • गालांवर सूज येते
  • चावताना दात दुखतात

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -