घरताज्या घडामोडीFestive Special Trains: पश्चिम रेल्वेवर ८ फेस्टिव्ह स्पेशल गाड्या, 'या' दिवशी सुरू...

Festive Special Trains: पश्चिम रेल्वेवर ८ फेस्टिव्ह स्पेशल गाड्या, ‘या’ दिवशी सुरू होणार बुकींग

Subscribe

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोवा या राज्यात या स्पेशल फेस्टिव्ह गाड्यांनी प्रवास करता येणार आहे

सणासुणीच्या दिवसात लोक सर्वाधिक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. या काळात रेल्वेला प्रचंड गर्दी असते. फेस्टिव्ह सीजनसाठी पश्चिम रेल्वेने साप्ताहिक आधारावर ८ सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी,भाऊबीज,छट पूजा यासारख्या सणांना घरी जाण्यासाठीचा प्रवाशांचा प्रवास सोपा होणार आहे. या ट्रेन पूर्णपणे आरक्षित असतील. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोवा या राज्यात या स्पेशल फेस्टिव्ह गाड्यांनी प्रवास करता येणार आहे. ट्रेन क्रमांक ०९११७ साठी बुकिंग नॉमिनेटेड prs काऊंटर आणि irctc वेबसाइटच्या माध्यमातून १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर ट्रेन क्रमांक ०९१९१,०९१९३ आणि ०९१८७ साठी २० ऑक्टोबरपासून बुकींग सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

वांद्रे टर्मिनल ते सूबेदारगंज स्पेशल ट्रेन

०९१९१ वांद्रे टर्मिनस ते सूबेदारगंजसाठी १७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर पर्यंत धावणार आहेत. ही गाडी वांद्रे टर्मिनसवरुन रात्री ७:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०:२० वाजता सूबेदारंज येथे पोहचेल. ट्रेन क्रमांक ०९१९२ ही ट्रेन सूबेदारगंज ते वांद्रे टर्मिनससाठी १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या दिवशी धावेल. ही गाडी सकाळी ६ वाजता सूबेदारगंज येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ११:५५ वाजता वांद्रे टर्मिनसला पोहचेल.

- Advertisement -

ही ट्रेन बोरीवली, वापी,सूरत,वडोदरा,रतलाम,कोटा,सवाई माधोपूर जंक्शन,बयाना,आगरा फोर्ट,टूंडला आणि कानपूर सेंट्रल स्टेशनवर थांबेल. ३ टियर आणि स्लीपर क्लास कोच सुविधा या गाडीत असेल.

वांद्रे टर्मिनस ते मऊ स्पेशल ट्रेन

ट्रेन क्रमांक ०९१९३ वांद्रे टर्मिनस ते मऊ जंक्शनसाठी २६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत धावेल. ही गाडी वांद्रे टर्मिनस वरुन रात्री १०:२५ ला सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता मऊ येथे पोहचेल. त्यानंतर ट्रेन क्रमांक ०९१९४ मऊ जंक्शन ते वांद्रे टर्मिनस ही गाडी २८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर पर्यंत धावेल. ही गाडी संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ४:३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहचेल.

- Advertisement -

बोरिवली,वापी,वडोदरा,रतलाम,कोटा,सवाई मधोपूर जंक्शन,गंगापूर सिटी, हिंदौन सिटी,बयाना,आगर कैंट,शमशाबाद टाऊन,कानपूर सेंट्रल,प्रगायराज जंक्शन,जंघाई,मरिआहू,जैनपूर या स्थानकांवर थांबेल.

सूरत ते सूबेदारगंज स्पेशल ट्रेन

ट्रेन क्रमांक ०९११७ सूरत ते सूबेदारगंजसाठी २२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत ही ट्रेन धावणार आहे. ही गाडी सकाळी ६ वाजता सूरतवरुन सुटणार असून दुसऱ्या दिवशी ७:५० ला सूबेदारगंजला पोहचेल. त्यानंतर ट्रेन क्रमांक ०९११८ सूबेदारगंज ते सूरत ही ट्रेन २३ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर पर्यंत धावेल. ही ट्रेन सकाळी ११:१०वाजता सूबेदारगंजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी१२: ४५ वाजता सूरतला पोहचेल.

ही ट्रेन भरुचा,वडोदरा,रतलाम,कोटा,सवाई माधोपूर जंक्शन,गंगापूर सिटी, हिंदौन सिटी,बयान, आगरा कँट,इटावा आणि कानपूर या स्थानकांवर थांबेल.

सूरत ते करमाली स्पेशल ट्रेन

ट्रेन क्रमांक ०९१८७ सूरत करमाली ही ट्रेन २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. ही गाडी २६ ऑक्टोबरला संध्याकाळी ७:५० वाजचा सूरतहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १:१० वाजच करमाली येथे पोहचेल. त्यानंतर ट्रेन क्रमांक ०९१८८ करमाली सूरत ही ट्रेन २७ ऑक्टोबर ते १ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. २७ ऑक्टोबरला दुपारी २:१० वाजता ही ट्रेन करमाली येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३६ वाजचा सूरतला पोहचेल.

वलसाड,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल,रोहा,खेड, चिपळून,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग,कुडाळ,सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.


हेही वाचा – IRCTC कसे बुक करायचे ऑनलाईन तिकीट?

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -