घरCORONA UPDATEडॉक्टरांच्या संपर्कात आलेले ८०० लोक होम क्वारंनटाईनमध्ये

डॉक्टरांच्या संपर्कात आलेले ८०० लोक होम क्वारंनटाईनमध्ये

Subscribe

मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्लीत संसर्ग झालेल्या कोणाची संख्या ३० होती, त्यातील ६ लोक दिल्लीच्या बाहेरचे आहेत.

देशभरात करोनाबाधित रुग्णांनाची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. आता देशातील ही संख्या ६५९ वर पोहोचली आहे. यामध्ये ५९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. यात ४२ जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणि १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्ली येथून ५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पाच जणांपासून ३५ लोकांना करोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्लीत संसर्ग झालेल्या कोणाची संख्या ३० होती, त्यातील ६ लोक दिल्लीच्या बाहेरचे आहेत.

करोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आले ८०० लोक

मोहल्ला क्लीनिक मधील एका डॉक्टरांनी सऊदी अरब मधून आलेल्या एका महिलेचे चेकअप केले होते. ती महिला करोना पॉझिटिव्ह होती. त्यानंतर डॉक्टर यांची पत्नी आणि मुलगी ही करोना पॉझिटिव्ह आढळून आली. दिल्लीमध्ये एकूण ३६ करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे मोहल्ला क्लिनिक डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या ८०० लोकांना १४ दिवस होम क्वारंनटाईन केले आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलीस कमिशन यांना निर्देश

दिल्ली पोलिसांनी सर्व पोलीस कमिशनर यांना आवश्यक सेवा आणि सामानाची डिलीवरी करनारे ई-रिटेलचे कर्मचारी आणि वाहनाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी निर्देश जारी केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -