घरCORONA UPDATEचिंता कायम! पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या उंबरठ्यावर!

चिंता कायम! पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या उंबरठ्यावर!

Subscribe

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. आज पुण्यात कोरोनाचे ८०७ नवे रुग्ण आढळले आहेत.

पुण्यात आज दिवसभरात ८०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नोंद झाली आहे. तसेच पिंपरीत २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ८४९वर पोहोचला आहे. तसेच आज उपचारदरम्यान नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा ६८५ झाला आहे. तर आज ६१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत पुण्यात १२ हजार २९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आज पिंपरी-चिंचवड या एकट्या शहरात २७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यू पैकी एक रुग्ण ग्रामीण भागातला आहे. आता पिंपरी-चिंचवड मधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ७७६वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज पिंपरी-चिंचवडमध्ये ७९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ हजार २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात २४ तासांत सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९०वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.


हेही वाचा – Corona Update: मुंबईत आज १,३७२ नव्या रुग्णांची नोंद, एकूण आकडा ८१ हजार पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -