घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये दिवसभरात ८१ नवे पॉझिटिव्ह; ८ बाधितांचा मृत्यू

नाशिकमध्ये दिवसभरात ८१ नवे पॉझिटिव्ह; ८ बाधितांचा मृत्यू

Subscribe

नाशिकl जिल्हा प्रशासनास सोमवारी (दि.१५) दिवसभरात ८१ नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक शहरातील ६५, मालेगाव ७, जिल्ह्याबाहेरील एक आणि नाशिक ग्रामीणमधील ५ रूग्णांचा समावेश आहे. नाशिक शहर व जिल्ह्यांत दोन दिवसांत 8 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात खोडेनगर, महादेववाडी सातपूर, बुरुडगल्ली, पारिजातनगर, नाईकवाडीपुरा, खडकाळी, वडाळा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २ हजार ६२ वर पोहोचली आहे.

नाशिक शहरात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच प्रशासनास सोमवारी (दि.१५) चार टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात दुपारी २४ अहवाल प्राप्त झाले असून ७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये दोडी (ता.सिन्नर), वणी (ता.दिंडोरी), जातेगाव (ता. नांदगाव), तळवाडे (ता.नांदगाव), पिंपळगाव बसवंत येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नाशिक शहरातील कथडा आणि जुने नाशिक भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान नाशिक शहरात ३३ नवीन पॉझिटिव्ह आढळून आले. तिसर्‍या टप्प्यात शहरात १९ नवीन पॉझिटिव्ह आढळून आले. चौथ्या टप्प्यात मालेगावचे ७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात २२५ संशयित रूग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. यात जिल्हा रूग्णालय १९, नाशिक महापालिका रूग्णालये १६६, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १, मालेगाव महापालिका रूग्णालय ८, नाशिक ग्रामीण रूग्णालये ६१ आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरातील रूग्ण
पारिजातनगर १, पेठरोड ५, सारडा सर्कल १, आडगाव नाका १, वडाळा २, पखाल रोड १, आरटीओजवळ १, शनी मंदिर, म्हसरूळ १, बागवानपुरा ९, भक्तीनगर, कथडा २, जुने नाशिक ९, उपनगर १, जेलरोड २, आझाद चौक १, तपोवन १, पंचवटी १, हनुमानवाडी ३, वडाळा ३, कोणार्कनगर १. सावतानगर ३, रामनगर,पंचवटी २, व्दारका २, अशोका मार्ग १, कोकणीपुरा १, कापड बाजार १, घास बाजार १, खुटवडनगर १, फावडे लेन १, पखाल रोड १, नाशिक ३.

४५८ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात आजवर १५ हजार ६०९ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यातील २ हजार ६२ रूग्ण करोनाबाधित आढळून आले. तर, ४५८ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisement -

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-२०६२
नाशिक ग्रामीण-३६१
नाशिक शहर-७३८
मालेगाव-८90
अन्य-७३
एकूण मृत – 129

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -