घरCORONA UPDATECorona Update: राज्यात आज सर्वाधिक ८१३९ रुग्ण आढळले; मृत्यूचा आकडा १० हजार...

Corona Update: राज्यात आज सर्वाधिक ८१३९ रुग्ण आढळले; मृत्यूचा आकडा १० हजार पार

Subscribe

राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सलग दोन दिवस कोरोनाबाधित रुग्णांनी नवा उच्चांक गाठला आहे. त्यातच शनिवारी कोरोना बळींनी १० हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात ८१३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६०० झाली आहे. तर राज्यात ९९ हजार २०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.

राज्यात २२३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १० हजार ११६ झाली आहे. यामध्ये मुंबई ३९, ठाणे १८, नवी मुंबई ८, कल्याण डोंबिवली मनपा ५, उल्हासनगर मनपा ७, भिवंडी ११, मीरा भाईंदर १३, वसई-विरार मनपा ९, जळगाव १७, पुणे २३, पिंपरी चिंचवड ११, सोलापूर ७, औरंगाबाद ९, जालना ८ आणि अन्य राज्य २ यांचा समावेश आहे. राज्यात ४३६० रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत १,३६,९८५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२,८५,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,४६,६०० (१९.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,८०,०१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४७,३७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -