घरताज्या घडामोडीपुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय! २४ तासांत ८३३ रुग्णांची नोंद

पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय! २४ तासांत ८३३ रुग्णांची नोंद

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात २४ तासांत ८३३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार ६९० वर गेली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून २४ तासांत ८३३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार ६९० वर गेली आहे. तर १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे ४८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. शहरात सलग दोन दिवस पाचशे पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये २०१ नवे रुग्ण

पुणे शहरात २४ तासांत ५८९ जणांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये २०१, तर पुणे ग्रामीणमध्ये ३६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर पुणे कँटोन्मेंट बोर्डात १५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात रुग्णसंख्या संख्या पाचशेच्या पुढेच वाढलेली दिसत आहे.

- Advertisement -

चाचण्यांमध्येही झाली वाढ

पुणे शहरात चाचण्यांमध्येही वाढ झाल्याचे समोर आले आहे. साडेतीन हजारांवरून चार हजारापर्यंत चाचण्यांची आकडेवारी पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील चाचण्यांची संख्या १ लाख १२ हजार ४१ एवढी झाली आहे. तर ३३३ रुग्ण गंभीर असून, ६१ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर २७२ रुग्ण अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर आहेत. दरम्यान, सोमवारी ४८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ९२९ झाली आहे. सध्या ६ हजार १९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

१२ जणांचा मृत्यू

पुणे शहरात पाच, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सात अशा १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी करण्यात आली. पर्वती, नांदेड फाटा, धनकवडी, शनिवार पेठ आणि हडपसर मधील सातववाडी येथील रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्याशिवाय पिंपरी-चिंचवडमध्ये सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एक खेड शिवापूर येथील आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंढरपूरला येणाऱ्या पालखीसह १०० वारकऱ्यांना परवानगी द्या, वारकरी सेवा संघाची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -