घरमहाराष्ट्रठाण्यात रंगणार ८५ तासांचे विश्वविक्रमी कविसंमेलन

ठाण्यात रंगणार ८५ तासांचे विश्वविक्रमी कविसंमेलन

Subscribe

अखिल भारतीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अकादमीच्यावतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कविसंमेलनात राज्यातील १००० कवी सहभागी होणार आहेत.

मराठी भाषा दिन केवळ एक दिवसापुरता साजरा केला जातो. पण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी नव्या पिढीला मराठी कवितेशी जोडले पाहिजे आणि जुन्या पिढीचे साहित्य प्रकाशात आणले पाहिजे. या हेतूने नव्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष गीत रामायणकार ग. दि. माडगूळकर जन्म शताब्दी, भाषाप्रभू राम गणेश गडकरी स्मृती शताब्दी, न्यानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचे १०१ वी जयंती वर्ष, मराठी मनाचा मानबिंदू पु. ल. देशपांडे जन्म शताब्दी वर्ष आहे, याचे औचित्यसाधुन या महान साहित्यिकांना आदरांजली वाहाण्याच्या हेतूने ‘पोएट्री मॅरेथॉन एक काव्य महोत्सव’ या महाकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन १८ एप्रिल रोजी सकाळी कोकण मराठी साहित्य परिषद संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तर प्रमुख पाहुणे कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर २१ एप्रिल रात्रीपर्यंत सलग ८५ तास कविसंमेलन होणार आहे.

कविसंमेलनाची नोंद ‘या’ रेकॉर्डलिस्टमध्ये होणार

अखिल भारतीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अकादमीच्यावतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कविसंमेलनात राज्यातील १००० कवी सहभागी होणार असून या विक्रमाची नोंद इंडिया स्टार बूक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बूक ऑफ रेकॉर्ड, भारत बूक ऑफ रेकॉर्ड, लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. डॉ. शंकर ( राज ) परब (कार्याध्यक्ष), डॉ. ज्योती परब, डॉ योगेश जोशी (उपक्रम प्रमुख), हेमंत नेहेते (समन्वयक), नीता नेहेते, राजेंद्र गोसावी (स्वागत समिती प्रमुख) यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

‘या’ निमंत्रीत कवींचा असेल विशेष सहभाग

गुरुदत्त वाकदेकर, प्रशांत डिंगणकर, शशिकांत तिरोडकर, डॉ. मधुसूदन घाणेकर, डॉ. नारायण तांबे, प्रा. दीपा ठाणेकर, मेघना साने, आरती कुलकर्णी, डॉ. अ. ना. रसनकुटे, राजेश साबळे, चंद्रशेखर भारती, आनंद पेंढारकर, विजय जोशी, सागरराजे निंबाळकर, आशा तेलंगे, नेहा धारुलकर, सविता इंगळे, हर्षल राणे, जयंत भावे, संतोष सावंत, विजय देसले, विश्वास कुलकर्णी, लक्ष्मण घागस, स्वाती जगताप, डॉ. सुधीर मोंडकर, सुनिल बडगुजर, डॉ. नरसिंग इंगळे, डॉ. प्रकाश माळी, बाळासाहेब तोरसकर, संतोष महाडेश्वर, वैभव धनावडे, अनुश्री फडणीस, अक्षय शिंपी, लीलाधर तळेले, स्नेहल अहिरे, निशिकांत महांकाळ, विनोद पितळे आदी निमंत्रित कवींसोबत १००० कवी कविता सादर करणार आहेत. साक्षी परब आणि संकेत खर्डीकर युवा कवी संमेलनाची जबाबदारी पहाणार आहेत.

७० तासांचा रेकॉर्ड मोडणारे संमेलन

८५ तास कविसंमेलन, १००० कवी, ४० सत्र आणि प्रत्येक सत्राचे वेगवेगळे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे असे या उपक्रमाचे स्वरूप असून या पूर्वीचा विक्रम ७० तासांचा होता, असे उपक्रम प्रमुख योगेश जोशी यांनी सांगितले. अखिल भारतीय कला क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमास आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, अक्षर मंच प्रकाशन, कोकण मराठी साहित्य परिषद कल्याण, साई इव्हेंट या सहयोगी संस्था या उपक्रमास सहकार्य करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -