घरताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८७ लाखाचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८७ लाखाचे नुकसान

Subscribe

नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानी चा आकडा अजून वाढण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरहानीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८७ लाख रुपयाची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशांसनाकडे प्राप्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानीचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावेत असे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सर्व तालुका तहसीलदाराना दिले आहेत.

कोकणात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे . जीवित व वित्त हानी बरोबरच घरे ,गोठे ,सार्वजनिक व खाजगी मालमत्ते चे ही फार मोठे नुकसान झाले आहे, माणसे व जनावरेही दगावली आहेत शेतीचेही नुकसान झाले आहे. खारेपाटण, बांदा येथील बाजारपेठा मध्ये पाणी भरल्याने व्यापाऱ्याचेही फार मोठे नुकसान झाले आहे.  या सर्व नुकसानीचे पंचनामे तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहायक करत आहेत या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तालुका तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.  प्राथमिक अहवालानुसार ८७  लाख रुपयांची नुकसानी अतिवृष्टी मध्ये झाली आहे.  मात्र अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे नुकसानी वाढणार आहे एक कोटी रुपयां पेक्षा जास्त नुकसानीची आकडेवारी जाऊ शकते.

- Advertisement -

आतापर्यंत तालुक्यातून प्राप्त झालेल्या नुकसानी अहवालामध्ये अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती दगावल्या असून यातील एक व्यक्ती अजून बेपत्ता आहे तसेच पूर्णतः पडझड झालेली घरे ५, अंशतः पडझड झालेली पक्की घरे २६०, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या २४, नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या ४ आहे. तर ११५  बाधीत गोठ्यांची संख्या आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये ३९ गावातील २९० कुटुंबातील १ हजार २७१ व्यक्तींना आज अखेर सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २६ मोठी दुधाळ जनावरे, दोन लहान दुधाळ जनावरे आणि एक ओढकाम करणारे जनावर मृत झाले आहे. जिल्ह्यात शाळा, शासकीय इमारत अशा १७ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून ३२४ खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय महावितरणचे ३२ लाख ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील ज्या ठिकाणी अद्यापही पाणी आहे, अशा शेत पिकांचे पंचनामे वगळता इतर ठिकाणचे पंचनामे सुरू आहेत. पावसाची उघडीप मिळाली असल्याने लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Taliye Landslide: NDRF बेस कॅम्प आता महाडमध्ये, प्रस्ताव मंजुर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -