घरताज्या घडामोडीगोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील अडसर ठरणारी ८७ बांधकामे हटवली

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील अडसर ठरणारी ८७ बांधकामे हटवली

Subscribe

मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी ८,५५० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी ८७ बांधकामे हटविण्याची कारवाई न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेच्या पी/ उत्तर विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी पार पाडली. यापूर्वी, ३ जानेवारी २०२३ रोजी भांडूप हद्दीतील सुदर्शन हॉटेल, तुळशेतपाडामधील ५५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली होती.

गोरेगाव-मुलुंड लिंक रस्त्याची लांबी १२. २० किमी आहे. या जोड रस्त्याचे काम चार टप्प्यात जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या एकूण १२.२० किमी अंतरापैकी पी/उत्तर विभागाच्या हद्दीमध्ये सुमारे २.८ किमी अंतराचा जोडरस्ता असणार आहे. हा जोडरस्ता सुमारे ४५.७० मीटर रूंदीचा प्रस्तावित असल्याने पी/उत्तर विभागाच्या हद्दीतील अंतरामध्ये २३७ बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीला अडथळा ठरणारी होती. या बांधकामांपैकी १६१ बांधकामे ही अधिकृत ठरली. त्यामध्ये १५४ वाणिज्यिक आणि ७ रहिवासी बांधकामांचा समावेश होता. सुमारे दीड वर्षांपूर्वी ७५ बांधकामाच्या मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

- Advertisement -

या याचिकेसाठी पी/उत्तर विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्यांच्या विरोधात निर्णय दिल्याने पालिका पी/ उत्तर विभागाच्या पथकाने उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या आदेशानुसार, पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ८७ बांधकामे हटविण्याची कारवाई केली.

दिंडोशी स्थित दिवाणी व सत्र न्यायालय ते फिल्म सिटी मार्ग जंक्शन या ७०० मीटरच्या टप्प्यात ही कारवाई करण्यात आली. पी/उत्तर विभागाच्या हद्दीतील या जोडरस्त्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. महापालिकेचे १० अभियंते, ८० कर्मचारी यांच्या सोबत २ पोकलेन संयंत्र, ५ जेसीबी संयंत्र, २ डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

पी/उत्तर विभागाच्या हद्दीतील गोरेगांव-मुलुंड जोडरस्त्याला अडथळा ठरणारी जवळपास सर्वच बांधकामे आता हटवण्यात आली असून यामुळे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या रूंदीकरणाला सुरूवात करणे संबंधित खात्याला शक्य होईल, अशी माहिती पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.


हेही वाचा : अखेर गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -