घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ८९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये ८९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास मंगळवारी (दि.१६) दिवसभरात ५५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक शहर 70, नाशिक ग्रामीण १६ आणि मालेगावातील ३ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात सहा बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १३५ मृत रूग्णांची नोंद झाली आहे. यात मालेगाव २, जिल्ह्याबाहेरील १, नाशिक शहर १, नाशिक ग्रामीण एकासह शेणित (ता.इगतपुरी) येथील बाधित रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार १५७ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात 808 रूग्ण बाधित आहेत.

जिल्ह्यासह नाशिक शहरात करोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग खबरदारी म्हणून रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवत असून त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले जात आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्हा प्रशासनास पाच टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता ११५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये नाशिक रोड ३, पेठरोड १, मखमलाबाद १, चांदशी १, जायखेडा १, जाखोरी १, मनमाड २, येवला ३, अंदरसुल १, इगतपुरी ४ रूग्णांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी ५.४५ वाजता नाशिक शहरात १७ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तिसर्‍या टप्प्यात सायंकाळी २० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये मालेगावी बंदोबस्तासाठी आलेले एसआरपीएफ नागपूरचे २ जवान, द्याने येथीक एक आणि नाशिक शहरातील १७ रूग्णांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात सायंकाळी नाशिक शहरातील २४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ७.२५ वाजता नाशिक शहरातील १० नवीन रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.

- Advertisement -

शहरातील रूग्ण असे…
नाशिक रोड ३, पेठरोड २, मखमलाबाद १, पंचवटी ४, उत्तमनगर १, दिंडोरी रोड १, जुने नाशिक ६, बाजीप्रभू चौक ६, नाईकवाडापुरा १, काठेगल्ली १, रामाचे पिंपळस २, बागवानपुरा १, औरंगाबाद रोड १, शिवाजीनगर १, शालिमार ३, सिडको १, भोईगल्ली १, आरटीओ कॉर्नर २, वैशालीनगर १, अजमेरी मशीद १, रामवाडी १, अशोका मार्ग २, वडाळा रोड १, इंदिरानगर १, गोरेराम लेन १, साईनाथनगर १, वडाळा २, मोहम्मदीया कॉलनी ५, गोसावीनगर २, देवळाली कँम्प ३, पाथर्डी फाटा ४, रामनगर, पंचवटी ४, वडाळानाका १, पखाल रोड ३, पोर्णिमा बसस्टॉप (व्दारका) २.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-२१५७ (मृत-१३५)
नाशिक ग्रामीण-380 (मृत-19)
नाशिक शहर-८०८ (मृत-40)
मालेगाव-893 (मृत-67)
अन्य-73 (मृत-9)
उपचार घेत असलेले रूग्ण-६७६

- Advertisement -

३१५ संशयित रूग्ण
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३१५ संशयित रूग्ण उपचारार्थ विविध रूग्णालयांत दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय २३, नाशिक महापालिका रूग्णालय १८३, मालेगवा रूग्णालय १३ आणि नाशिक ग्रामीण रूग्णालयात ९६ रूग्ण झाले आहेत.

६०७ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात मंगळवारअखेर १६ हजार ८९ संशयित रूग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार १५७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ६०७ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -