घरमहाराष्ट्रहीच तुमची मानसिकता का? भगवान गडावर पंकजा मुंडे- नामदेव शास्त्रींमध्ये वाद

हीच तुमची मानसिकता का? भगवान गडावर पंकजा मुंडे- नामदेव शास्त्रींमध्ये वाद

Subscribe

पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्त्रीचा मोठा आवाज तुम्हाला तिचा अहंकार वाटतो, आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ म्हणता, हीच तुमची मानसिकता आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

भगवान गडाच्या 89 व्या फिरता नारळी सप्ताह होता. या सप्ताहाला महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. पार्थर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावात हा कार्यक्रम झाला, यावेळी पंकजा मुंडे तसेच धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्त्रीचा मोठा आवाज तुम्हाला तिचा अहंकार वाटतो, आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ म्हणता, हीच तुमची मानसिकता आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. 89th Bhagwan Gada’s coconut Saptah Pankaja Munde and Namdev Shastri argument during programme

- Advertisement -

नेमकं घडलं काय?

या कार्यक्रमादरम्यान नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आपापसात न भांडण्याचा सल्ला दिला.
पंकडा मुंडेंसोबत माझं वैर नाही, त्यांचे चमचे खराब आहेत. पंकजांनी अहंकार कमी करावा, स्वाभीमान ठेवावा, अहंकार सोडा, असा सल्ला नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना दिला. तसेच, दोघेही मुंडे घराण्यातील आणि समाजासाठी महत्त्वाचे आहेत, असेही नामदेव शास्त्री म्हणाले.

नामदेव शास्त्री यांनी दिलेल्या सल्ल्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्या बोलण्याला माझ्या उंचपुऱ्या व्यक्तीमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायात बोलताना मोठा आवाज केलेला त्याला अहंकार समजू नका. स्त्री बोलली की अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ समजतात ही तुमची मानसिकता आहे का? असा सवाल करत नामदेव शास्त्रींना मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

( हेही वाचा: बाबरीप्रकरणात उद्धव ठाकरेंचं योगदान काय? तेव्हा कोणत्या बिळात होते? नितेश राणेंचा सवाल )

धनंजय मुंडे काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी आमच्यात वाद नसल्याचे म्हटले. मुंडे म्हणाले की भगवान बाबांचा भक्त हीच आपली खरी ओळख आहे. राजकारणात आम्ही कितीही दूर असलो तरी तेथे ताई माझ्याजवळ आहे. पूर्वी एकदा पंकजाताई म्हणाल्या होत्या की, मी भगवान गडाची पायरी आहे. असे असेल तर मी त्या पायरीचा दगड आहे. मी लहान आहे. माझ्या सभा मोठ्या होत नाहीत. पंकजा ताईंच्या सभा मोठ्या होतात. भगवान गडासाठी जे करता येईल, ते आम्ही दोघे करुन असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -