घरमहाराष्ट्रआठवीतल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Subscribe

आजच्या काळात शाळकरी मुलांमधील तणावाचं प्रमाण वाढत असल्याचा दावा मानसोप्चारतज्ञ करत आहेत. मानसिक आजारांना बळी पडून आत्महत्येसारखं गंभीर पाऊल उचलण्याच्या घटना घडत आहेत. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी मधलीवाडी येथील आठवीत शिकणारा ओमकार कदम (१३) या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण सांगुळवाडी गाव हादरून गेले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत ओमकार हा माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या ठिकाणी इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. सकाळी ८.३० च्या दरम्यान घरातील एका खोलीत दरवाजा बंद करून बसला होता. काही वेळाने त्याची आई त्याला हाक मारू लागली. परंतु खोलीतून काहीच आवाज येत नव्हता दरम्यान शेजारी जमा झाले. त्यांनी दरवाजा धक्का मारून उघडला. खोलीत ओमकार गळफास लावलेल्या स्थितीत त्यांना आढळून आला. खोलीतील लाकडी बाराला दोरी बांधून त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहीती वैभववाडी पोलिसांना देण्यात आली. पो. उपनिरिक्षक जयश्री भोमकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. 

मयत ओमकार याच्यामागे त्याचे वडील रोज ‘अभ्यास कर’ असा तगादा लावत होते. यांच्या या बोलण्याला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली असावी. असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पो. हवालदार अनमोल रावराणे करत आहेत.


वाचा: ‘या’ कंपनीत पगार होणार दुप्पट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -