घरताज्या घडामोडीकोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२वीचे वर्ग 'या' दिवशी सुरु होणार, ...

कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२वीचे वर्ग ‘या’ दिवशी सुरु होणार, शासनाच्या सूधारित मार्गदर्शक सूचना जारी

Subscribe

शाळा सुरु होण्यापूर्वी 'चला मुलांनो शाळेत चला' अशी मोहिम शाळेने राबवावी

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग येत्या १५ जुलै २०२१पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने याआधी देखील कोरोनोमुक्त ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्याच दिवसी त्या निर्णयला शासनाकडून स्थगिती देण्यात आली. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षक विभागाची घाई गडबड केल्याचे दिसून आल्याने शासनाने या निर्णयास स्थगिती दिली होती. मात्र आज पुन्हा नव्याने कोरोनामुक्त क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देत शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ( 8th to 12th std school in Corona Free Zone will start on 15 july 2021, Government issued revised guidelines)

कोरोनामुक्त ग्रामीण क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यासाठी आधी पालकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. काय आहेत त्या सूचना जाणून घ्या.

- Advertisement -

ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

  • ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक,मुख्यध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करून शाळा सुरु होण्यासाठी चर्चा करावी .
  • शाळेत कोणी कोरोनाग्रस्त आढळल्यास शाळा तात्काळ बंद करावी.
  • टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करावी. अदला बदलीच्या दिवशी महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्यावे.
  • शिक्षकांच्या राहण्याची सोय गावातच करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय टाळावा.
  • वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये ६ फूटांचे अंतर ठेवावे. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत.
  • शाळा सुरु होण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहिम शाळेने राबवावी.
  • शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
  • शाळेत कोरोना सेंटर असल्यास ते एक तिथून दुसऱ्या ठिकाणी हलवावे आणि शाळेचे त्वरित निर्जुंकिकरण करावे.
  • शाळेत विलगीवकरण केंद्र असेल्यास तिथे शाळा भरवणे शक्य नसल्याचे खुल्या परिसरात शाळा भरवावी.
  • शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे अनिवार्य.
  • सतत हात साबणाने हात धुणे, मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे विद्यार्थी तसेच शिक्षकांना अनिवार्य आहे.

    हेही वाचा – बायको जात चोरते अन् नवरा राजदंड, रुपाली चाकणकर यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -