MPSC Exam आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह ९ जण अटकेत; २५ जणांविरोधात गुन्हा

एमपीएससीच्या आंदोलनात सहभागी झालेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ९ जणांना अटक.

9 arrested including Gopichand Padalkar in MPSC Exam agitation
MPSC Exam आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह ९ जण अटकेत; २५ जणांविरोधात गुन्हा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने एमपीएससीची (MPSC Exam ) नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर उतरुन एकच आंदोलन केले. या आंदोलनात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास आंदोलन करत एकच गर्दी केली होती. पोलिसांनी अनेकदा सांगूनही त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. अखेर पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बळाचा वापर करुन आंदोलन मोडून काढले. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यासह २० ते २५ आंदोनकर्त्यांवर गैर काद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांची धरपकड करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली असून २५ जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून येत्या १४ मार्च रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी देखील एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, परिक्षेची नवी तारीख मुख्य सचिव सिताराम कुंटे हे आज, शुक्रवारी जाहीर करतील, नवीन तारखा या जास्तीत जास्त आठ दिवसांमधील असतील. परिक्षा पुढे ढकलल्याने एकाही विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून वयोमर्यादेबाबत राज्य सरकार कोणतेही बंधन घालणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केलेल्या निवेदनात दिले. त्यामुळे आता पुढील तारीख कोणती असणार हे पहावे लागणार आहे.


हेही वाचा – झपाट्याने वाढताहेत कोरोना रुग्ण महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला चिंता!