घरमहाराष्ट्रराज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना - भाजपचे पुन्हा 9 चे गणित

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना – भाजपचे पुन्हा 9 चे गणित

Subscribe

एकनाथ शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर 38 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पार पडला. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्य़ा उपस्थित पहिल्या टप्प्यात 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9, आणि भाजपच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. तर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही 9 ऑगस्ट. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 9 अंकाचा खास योग जुळवून आणण्यात आला होता. याच 9 अंकाने आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सेना – भाजपा राजकारणात पूर्वीपासूनचं 9 अंकाला अधिक महत्त्व देताना दिसले. 2022च्या शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी देखील त्यांनी 9-9-9 हे समीकरण जुळवून आणले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची जन्म तारीख पण 9 फेब्रुवारी 1964 अशी आहे. त्यामुळे त्यांच्या जन्म तारखेतचं 9 चा उल्लेख पहिला आलाय.

- Advertisement -

हेही वाचा : सत्तांतरानंतर समीकरणं बदलली! कांजूर कारशेडविरोधातील लढाईला पूर्णविराम, याचिका मागे

30 जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मात्र तारीख पे तारीख दिल्या जात होत्या. 6 ऑगस्टच्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींनी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाला हिरवा कंदिल दिला. मंत्रीपद वाटपाचे सूत्र यापूर्वीच ठरले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि पहिल्या टप्प्यातील मंत्रिमडळ विस्तारातील मंत्र्यांची संख्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी निश्चित करायची होती. अखेर दोन्ही पक्षांकडून 9 ऑगस्ट ही तारीख निश्चित झाली.

ज्यानुसार एकनाथ शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गटातून आमदार दादा भुसे, संदिपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील अशी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांची नावं आहेत. तर भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, शंभुराज देसाई आणि मंगलप्रभात लोढा या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

युतीच्या पहिल्या निवडणुकीतही 9 चेच गणित

सन 1995 साली देखील भाजप – शिवसेना युती जेव्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली होती, तेव्हाही 9चेच गणित मांडले गेले होते. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाने 171 – 117 असा फॉर्म्युला ठरवला होता. ज्यातही 9 – 9 चेच गणित आहे. त्या काळी देखील भाजप- सेना युतीच्या 9 अंकाच्या समीकरणावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. आताही युतीमध्ये हेच गणित पाहायला मिळाले.


वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : नुपूर शर्माला जेल की बेल? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -