Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तिहेरी अपघातात ९ जण जागीच ठार

तिहेरी अपघातात ९ जण जागीच ठार

Subscribe

या अपघातात महाराष्ट्रातील तीघांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या सोनगडमध्ये टँकर, बस आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ९ जण जागीच ठार झाले असून २४ प्रवासी जखमी झाले आहेत. गुजरात राज्य परिवहन मंडळाची बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, बस अर्धी कापली गेली. यावेळी बसच्या मागून येणाऱ्या क्रुझरने बसला धडक दिली.

- Advertisement -

बस कुशलगठ-सुरत-उकई अशी निघाली होती. ही बस सोनगड जवळच्या पोखरण गावाजवळ येताच समोरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिली. टँकरची धडक इतकी जोरदार होती की, टँकर बसच्या आत घुसला. तर बसच्या मागून येणाऱ्या क्रुझरने पाठीमागून बसला धडक दिली. या अपघातात महाराष्ट्रातील तीघांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -