घरताज्या घडामोडीCorona: राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा नऊ हजारांवर!

Corona: राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा नऊ हजारांवर!

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा बुधवारी नऊ हजारावर पोहोचला तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. सध्या १ हजार ९१२ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत ७ हजार ८४ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत राज्यात ९ हजार ९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली होती, त्यात ९३७ पोलीस अधिकारी तर ८ हजार १८५ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता.

बुधवारी दिवसभरात १३८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. या पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या राज्यात १ हजार ९१२ पोलिसांवर उपचार सुरू आहे. त्यात २०७ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०५ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बुधवारी दिवसभरात १२२ पोलीस कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांची संख्या ७ हजार ८४ झाली आहे. त्यात ७२२ पोलीस अधिकारी आणि ६ हजार ३६२ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बुधवारी दिवसरात दोन पोलीस अंमलदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्यू पोलिसांची संख्या आता १०० वर पोहोचली आहे.

- Advertisement -

मृत पोलिसांमध्ये आठ पोलीस अधिकारी तर ९२ पोलीस कर्मचारी आहेत. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३२३ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८८३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख ८ हजार ७८८ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४६ अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत ३२ हजार ३१० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९४ हजार १०२ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १७ कोटी ४२ लाख १६ हजार ३०४ रुपयांचा दंड वसुल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -