Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE रायगडमध्ये ९० जणांना Remdesivir इंजेक्शनचा त्रास, जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवला

रायगडमध्ये ९० जणांना Remdesivir इंजेक्शनचा त्रास, जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवला

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे Remdesivir इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी Remdesivir चा काळाबाजार सुरु आहे. याच दरम्यान राजगड जिल्हात हेटेरो हेल्थ केअर कंपनीने पुरवलेले Remdesivir इंजेक्शन दिल्याने ९० जणांना इंजेक्शनचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. संबंधीत कंपनीच्या आदेशावरून हा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. २८ आणि २९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९० जणांना या इंजेक्शनचा त्रास झाल्याचा तक्रारी समोर आल्या होत्या त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी सांगितले.

दरम्यान काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होता. त्यामुळे सरकारने यावर ठोस धोरण निश्चित करत जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यावर नियंत्रण आणेल असे जाहीर केले, त्यामुळे खासगी औषधांचा दुकानांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीवर बंधणे आलीत. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी ठराविक पुरवठादार नियुक्त करण्यात आले होते. ज्यांच्या मार्फत रेमडेसिवीर गरज असलेल्या रुग्णांचे नाव नोंदवून पुरवठा केला जात होता. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -

दरम्यान रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीने ५१० रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला. त्यापैकी ३१० इंजेक्शन जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना देण्यात आली. दरम्यान २९ एप्रिल रोजी विविध रुग्णालयातील एकूण ९० रुग्णांना इंजेक्शन टोचल्यानंतर काही प्रमाणात त्रास जाणवू लागल्याचा तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर कंपनीने कोविकोफर नावाच्या बॅच नंबरचे एचसीएल २१०२३ इंजेक्शनचा वापर थांबविण्याची विनंत केली. त्यानंतर पेण येथील रायगड सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाने विभागानचे इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले.


 

- Advertisement -