घरताज्या घडामोडीCorona Virus : एप्रिल, मे आणि जून महिन्यातील ९० टक्के सहली रद्द

Corona Virus : एप्रिल, मे आणि जून महिन्यातील ९० टक्के सहली रद्द

Subscribe

करोना व्हायरसचा परिणाम पर्यटनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या लोक करोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक सहली रद्द करत आहे.

सध्या चीननंतर भारतात करोना थैमान घालत आहे. भारतात करोना व्हायरसचे ६० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ३० करोना रुग्ण संशयित आढळले आहेत. तर पुण्यामध्ये काल पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. करोनामुळे भारतीय पर्यटनावर परिणाम झाला असल्याच समोर आलं आहे. करोनामुळे अनेक सहली रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील ९० टक्के सहली रद्द झाली असल्याचं पुण्यात टुरिस्ट कंपनीने सांगितलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात टुरिस्ट कंपनीची पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषद करोनामुळे पर्यटनात झालेले नुकसानबाबत सांगितलं. तसंच लोकांना सहल रद्द करण्याचं आवाहनही त्यांनी दिलं.

ज्या ठिकाणी जास्त करोनाचा जास्त पसरला आहे. त्या ठिकाणी जाणं टाळावं. पण ज्या ठिकाणी करोना जास्त पसरला नाही आहे त्या ठिकाणी जाण्यास काही हरकत नाही असं यावेळी पत्रकार परिषदेने टुरिस्ट कंपनीच्या संचालकांनी सांगितलं.

- Advertisement -

करोनापासून वाचण्यासाठी उपाय

  • सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क साधणे टाळा.
  • हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा हॅंड वॉश कायम जवळ ठेवा.
  • मांस आणि अंडी योग्य प्रकारे शिजवून घ्या.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा.

हेही वाचा – पिंपरी चिंचवडमध्ये आढळली करोना संशयित महिला; ८ जण रुग्णालयात दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -