Corona Update: राज्यात ९,१८१ नव्या रुग्णांची नोंद, २९३ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

9,181 new COVID19 positive cases and 293 deaths have been reported in Maharashtra today
Corona Update: राज्यात ८,१८१ नव्या रुग्णांची नोंद, २९३ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.४४ टक्के एवढा आहे.

राज्यातील Active रुग्ण

राज्यात सध्या ५ लाख २४ हजार ५१३ जण कोरोनाबाधित असून यामध्ये १ लाख ४७ हजार ७३५ जण Active रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत राज्यात १८ हजार ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ५८ हजार ४२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 


हेही वाचा – रायगडमध्ये प्रवासासाठी ‘ई-पास’ अनिर्वाय