घरमहाराष्ट्रयावर्षी सरासरीच्या 94 टक्के पाऊस! जुलै-ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला बसणार फटका; स्कायमेटचा अंदाज

यावर्षी सरासरीच्या 94 टक्के पाऊस! जुलै-ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला बसणार फटका; स्कायमेटचा अंदाज

Subscribe

मुंबई : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिठीने (hailstones) आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची (Farmer) चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. स्कायमेटने या खासगी संस्थेने यावर्षीच्या पावसाबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यात 94 टक्केच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

स्कायमेटने सांगितलेल्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 858.6 मिमी पावसाची सरासरी राहण्याची शक्यता आहे. गुजरातसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने आता प्राथमिक अंदाज दिला असला तरी तो पुन्हा एकदा मान्सूनचा अंदाज देणार आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान संस्थेने एल निनोचा परिणाम मान्सूनवर होण्याचे भाकित केले होते. आता स्कायमेटने देखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. मात्र अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज आलेला नाही. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज 15 एप्रिलला वर्तवेल त्यानंतरच पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत थोडा अंदाज येईल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी भारतीय हवामान विभाग पुन्हा एकदा अंदाज देईल, त्यानंतर यावर्षीच्या पावसाची स्थिती नेमकी काय राहील हे समजेल.

स्कायमेट विषयी थोडक्यात
स्कायमेट ही भारतातील सर्वात मोठी हवामान अंदाज आणि कृषी जोखीम सांगणारी कंपनी आहे. स्कायमेट या भारतातील एकमेव खाजगी हवामान अंदाज एजन्सीची 2003 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्याने विश्वसनीय आणि अचूक हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी ओळखली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -