घरमहाराष्ट्र९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

Subscribe

राज्यात वाढत्या कोरोना संक्रमाणामुळे यंदा ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते. कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याबद्दल विचार सुरु असतानाच अखेर आज संमेलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. महामंडळाने याबाबतची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

कोरोनामुळे यंदाचे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही असं महामंडळाने ठरवलं होतं. पण नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोनाची लागण कमी कमी होत गेली. डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या टोक्यात आली होती. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा जाहीर केला होता. मात्र आता कोरोनाचं रुग्ण पुन्हा वाढल्याने साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.

- Advertisement -

94 व्या साहित्य संमेनलानाची तयारी जोरदार सुरु होती. तसेच निधी संकलन आणि इतर तयारीही जोमाने सुरु होती मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने नाशिकमध्ये कोरोना कमी होण्याची पुरेशी वाट पाहिली, मात्र कोरोनाचा प्रसार कमी होण्याची चिन्ह दिसत नसल्याने नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संमेलन अध्यक्ष, साहित्य संस्थाचे प्रमुख पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड झाली होती.


हेही वाचा- खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन काँग्रेस- राष्ट्रवादी आमने-सामने?

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -