घरताज्या घडामोडीडॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा

डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा

Subscribe

खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे साहित्यामधील योगदान

अनेकांसाठी अवघड विषय असणारा विज्ञान, या विषयात आपल्या लेखनशैलीतून आवड निर्माण करणारे ज्येष्ठ खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९४ व्या (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी निवड झाली आहे. अनेक दिवसांपासून अध्यक्षपदासाठी नारळीकरांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर आज (रविवार) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी वैज्ञानिक साहित्यक म्हणून नारळीकरांना मान मिळाला आहे. जयंत नारळीकरांचे साहित्यामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक विज्ञानाविषयक पुस्तके लिहिली आहे. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘चार नगरांतील माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वसामान्यांना खगोलशास्त्र समजण्यासाठी नारळीकरांनी खूप प्रयत्न केले असून त्यांनी यासाठी सर्व माध्यमांचा वापर केला.

जयंत नारळीकरांची पुस्तके..

  1. अंतराळातील भस्मासुर
  2. अंतराळातील स्फोट
  3. अभयारण्य
  4. चला जाऊ अवकाश सफरीला
  5. टाइम मशीनची किमया
  6. प्रेषित
  7. यक्षांची देणगी
  8. याला जीवन ऐसे नाव
  9. वामन परत न आला
  10. व्हायरस
  11. अंतराळ आणि विज्ञान
  12. गणितातल्या गमतीजमती
  13. आकाशाशी जडले नाते
  14. नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
  15. युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची
  16. नभात हसरे तारे
  17. विश्वाची रचना
  18. विज्ञान आणि वैज्ञानिक
  19. विज्ञानगंगेची अवखळ वळणे
  20. विज्ञानाची गरुडझेप
  21. समग्र जयंत नारळीकर
  22. Seven Wonders Of The Cosmos
  23. सूर्याचा प्रकोप
  24. Facts And Speculations In Cosmology
  25. मी शास्त्रज्ञ कसा झालो?
  26. विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक

आर. जे. टेलर, डब्ल्यू. डेव्हिडसन आणि एम.ए.रुडरमन यांच्यासोबत जयंत नारळीकरांनी Astrophysicist (१९६९) ग्रंथ लिहिला आहे. शिवाय Action At ए डिस्टन्स इन फिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी (१९७४) फ्रेड हॉईल यांच्यासोबत हा ग्रंथ नारळीकरांनी लिहिला आहे. तसेच स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स (१९७७) हा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला. नारळीकरांचे खगोलीय भौतिकी, गुरुत्वाकर्षण, विश्वोत्पत्तिशास्त्र इ. विषयांवरील त्यांचे ७० हून अधिक संशोधनात्मक निबंध आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -