घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ९५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह, ७ बाधितांचा मृत्यू

नाशिकमध्ये ९५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह, ७ बाधितांचा मृत्यू

Subscribe

नाशिक : मालेगावात रूग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला असताना नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनास बुधवारी (दि.१७) ९५ नवे रूग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ६१, नाशिक शहर ३१ आणि मालेगाव शहरातील ३ बांधित रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक शहरात ६ व नाशिक ग्रामीणमध्ये करोनाबाधित एकाचा मृत्यू झाला आहे. जायखेडा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जायखेडयात १० पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार २५२ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात ८३९ रूग्ण आहेत.

नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे. बुधवारी दिवसभरात विंचुर गवळी ४, येवला १६, भगूर १, गिरणारे १, इगतपुरी २, बालगाण ३, सटाणा येथे २ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांचा आकडा २ हजार २५२ झाला असून त्यापैकी १४१३ रूग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २५४, नाशिक शहर ३३९, मालेगाव शहर ७६४, जिल्ह्याबाहेरील ५६ रूग्णांचा समावेश आहे. सध्या ६९७ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ११६ संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय ७, नाशिक महापालिका रूग्णालये ७२, नाशिक ग्रामीण रूग्णालये २८, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ३, मालेगाव रूग्णालयात ६ रूग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisement -

६६५ अहवाल प्रलंबित
आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील १६ हजार ४३३ रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी २ हजार २५२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून ६६५ संशयित रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण ६८, नाशिक शहर ३७९, मालेगाव शहर २१८ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-२२५२ (मृत-१४२)
नाशिक ग्रामीण-४४१ (मृत-२०)
नाशिक शहर-८३९ (मृत-४६)
मालेगाव शहर-८९६ (मृत-६७)
अन्य-७६ (मृत-९)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -