५ टक्क्यांसाठी ९५ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

सीबीएसई मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही राबवण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला आहे.

Eleventh CET on 21st August, find out the nature of offline exam

सीबीएसई मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही राबवण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला आहे, मात्र दरवर्षी इयत्ता अकरावीला प्रवेश घेणार्‍या एकूण विद्यार्थ्यांपैकी अवघे ५ टक्के विद्यार्थी सीबीएसईचे असूनही राज्य मंडळाच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या प्रतीक्षेत ठेवण्याचा शिक्षण संचालनायलाचा निर्णय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया पालक व विद्यार्थ्यांमधून उमटत आहे. (95 percent students waiting for admission for 5 percent)

राज्य मंडळाच्या दहावीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच विभागांमध्ये इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग पहिला भरला आहे, मात्र शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा दुसरा भाग भरण्याच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी तणावाखाली वावरत आहेत. दरम्यान, २०२२-२३ मध्ये राज्य मंडळाचे इयत्ता १० वी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले तरी सीबीएसईचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने शिक्षण संचालनालयाकडून सर्वांना न्याय मिळावा या उद्देशाने ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर होताच पुढील कार्यवाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर यांनी जाहीर केले आहे.

दरवर्षी इयत्ता ११ वी साठी राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात होणार्‍या एकूण प्रवेशापैकी साधारणपणे ५ टक्के विद्यार्थी हे सीबीएसई मंडळाचे असल्याचे शिक्षण संचालकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईच्या पाच टक्के विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना वेठीस का धरण्यात येत आहे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षण संचालनालयाकडून सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया संथगतीने राबवण्यात येऊन राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

भाग २ लवकरच भरण्यात येणार

ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भाग -१ भरून तो तपासून करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रवेश फेरी वेळापत्रक व भाग २ भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. तसेच सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे मिळविणे सुरू ठेवावे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.