Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला ढोलताशांच्या गजरात प्रारंभ

मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला ढोलताशांच्या गजरात प्रारंभ

Subscribe

 जळगाव : अखिल भारतीय 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. यावेळी शंखनाद, टाळ मृदंग आणि ढोलताशांच्या गजरात ग्रंथाचे पूजन केले. यावेळी मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा, उषा तांबे आणि जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष आणि राज्याचे ग्रामविकास तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित होते.

अमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॅा. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह वाङ्मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल संस्थान येथून मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी उत्साह प्रारंभ झाला. यावेळी शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहर गर्दीने अगदी फुलून गेले होते.

- Advertisement -

ग्रंथदिंडीवर मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव केला. ग्रंथदिंडीपासून ते दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी बाजार, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक, स्टेट बँक , पोस्ट ऑफिस आणि उड्डाणपूल चौकात सुंदर रांगोळी काढून ग्रंथदिंडी आणि सारस्वतांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मंत्री गिरीश महाजन , जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि केशव स्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष डॅा. भरतदादा अमळकर हे सर्व ग्रंथदिंडीत उपस्थित होते.

ग्रंथदिंडीमध्ये अनेक संस्थांचा सहभाग

केशव शंखनाद पथक, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय, सर्व प्रमुख कर्मचारी, एनएसएस, एनसीसी वसतीगृह विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, गंगाराम सखाराम शाळा अमळनेर, कन्या शाळा , अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपारिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य , वासुदेव पथक, जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा, सानेगुरूजी, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड्:मय मंडळाचे समिती सदस्य, वारकरी पाठशाला अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र मतदान विभाग, एसएनडीटी महाविद्यालय, एमएसडब्यू कॅालेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, फार्मसी महाविद्यालय, उदय माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातोडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कॅालेज या अनेक संस्थांचा मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडीत सहभाग होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -