घरमहाराष्ट्र30 वर्षीय मॉडेलची अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या

30 वर्षीय मॉडेलची अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या

Subscribe

मुंबई – अंधेरी परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत एका 30 वर्षीय मॉडेल आकांक्षा मोहनने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हॉटेलच्या एका खोलीत आकांक्षा मोहनचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षा मोहनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मॉडेलने स्वत:ला खोलीत घेतले कोंडून –

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास आकांक्षा मोहनने हॉटेलमध्ये चेक इन करून जेवणाची ऑर्डर दिली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने आकांक्षा मोहनच्या रुमची बेल वाजवली आणि अनेकदा आवाज दिला, पण खोली उघडली नाही. त्यानंतर वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. यानंतर व्यवस्थापकाने तत्काळ पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मॉडेलचा मृतदेह  –

- Advertisement -

माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेल गाठून मास्टर चावीने मॉडेलची खोली उघडली. हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडताच खोलीत प्रवेश करणाऱ्यांना आकांक्षा मोहनचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. आकांक्षा मोहनने खोलीत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनास्थळावर आढळली सुसाईड नोट –

हॉटेलमधील आकांक्षा मोहनच्या खोलीतून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. माफ करा, याला कोणीही जबाबदार नाही, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. कोणालाही त्रास देऊ नका, मी आनंदी नाही, फक्त शांतता हवी आहे, असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे बोलले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -