Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Mumbai Crime : मीरा रोडमध्ये 'श्रद्धा' हत्याकांड, करवतीने केले मृतदेहाचे तुकडे

Mumbai Crime : मीरा रोडमध्ये ‘श्रद्धा’ हत्याकांड, करवतीने केले मृतदेहाचे तुकडे

Subscribe

दिल्लीतील श्रद्धा हत्या काडांचे पडसाद मुंबईतील मीरा रोडमध्ये उमटले आहेत. मीरा रोडमधील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेची हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर आरोपी पळून जाणाच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी या घटनेची चौकशी करत आरोपींना ताब्यात घेतले.

उत्तन येथील समुद्रात चार दिवसांपूर्वी एका बॅगेत शीर नसलेले मृतदेहाचे दोन तुकडे सापडले होते. त्यातही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून आरोपींना पोलिसांनी घटना स्थळावरून ताब्यात घेतले.

- Advertisement -

मीरा-भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग, गीता नगर फेस -७, जे विंग सदनिका क्रमांक ७०४ मध्ये मागील तीन वर्षांपासून एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यात मनोज सहानी वय ५६ आणि मृत सरस्वती वैद्य वय ३२ हे राहत होते. यामध्ये आरोपीने करवतीच्या (आरी)च्या साहाय्याने तुकडे तुकडे करून काही तुकडे नष्ट केले आहेत. तर काही तुकडे रस्त्यावरील कुत्र्यांना टाकल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

शरीराचा अर्धा भाग हा घटना स्थळावर मिळाला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी आरोपी पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सहानी यांना ताब्यात घेतले. सहानी यांचा अधिक तपास केला जात आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नयानगर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती मीरा-भाईंदर परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.


हेही वाचा : Rahul Narwekar : लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार; राहुल नार्वेकरांच्या वक्तव्याने खळबळ


 

- Advertisment -