घरउत्तर महाराष्ट्रकोयता घेऊन फिरणार्‍या टवाळखोरास अटक

कोयता घेऊन फिरणार्‍या टवाळखोरास अटक

Subscribe

अंबड केवल पार्क परिसरात कोयता घेऊन फिरणार्‍या टवाळखोरास अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. जयेश दिलीप पाटील (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, अंबड लिंक रोड, अंबड) असे अटक केलेल्या टवाळखोराचे नाव आहे.

गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई तुषार सुरेश मते यांना केवल पार्क, अंबड, येथे तरुण विनापरवाना बेकायदा धारदार लोखंडी कोयता घेवून येणार असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्तशेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, पोलीस हवालदार पवन परदेशी, सचिन करंजे, समाधान शिंदे, अनिल गाढवे यांनी सापळा रचून संशयित जयेश पाटील यास अटक केली. पोलिसांच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी कोयता जप्त केला. पुढील तपास अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक . अशोक नजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -