घरमहाराष्ट्रधुलिवंदनाला गालबोट; ताडदेव येथील अंध शाळेतील सात मुलांना अन्नातून विषबाधा

धुलिवंदनाला गालबोट; ताडदेव येथील अंध शाळेतील सात मुलांना अन्नातून विषबाधा

Subscribe

मुंबई : देशभरात होळीनंतर दुसऱ्याच दिवशी धुलिवंदन जल्लोषात सुरू असताना मुंबईतील ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल अंध शाळेतील सात मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यामुळे धुलिवंदनासारख्या सणाला गालबोट लागले. सुदैवाने या सात मुलांना तातडीने नजीकच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल अंध शाळेत धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास शाळेतील मुलांनी अन्नग्रहण केल्यावर काही अवधीतच सात मुलांच्या पोटात दुखू लागले व त्यांना उलट्या झाल्या. तर दोन मुलांना ताप आला. त्यामुळे शालेय व्यवस्थापन हादरले. या मुलांना झालेला त्रास पाहताच शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांना तत्काळ नजीकच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

- Advertisement -

हेही वाचा – सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ दगड, सतीश लळीत यांची माहिती

नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्परता दाखवत या सर्व सात मुलांवर युद्धपातळीवर उपचार सुरू केले. त्यामुळे मुलांच्या जीविताचा संभाव्य धोका टळला. या सात मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समजते. यामुळे या घटनेची स्थानिक पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या सात मुलांमध्ये 11 वर्षाची दोन मुले तर 14 ते 18 वयोगटातील पाच मुलांचा समावेश आहे.

- Advertisement -

व्हिक्टोरिया शाळेतील सात मुलांना अन्नातून विषबाधा झाली. मात्र त्यांना तत्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. आम्ही स्वतः लक्ष ठेवून आहोत, असे उद्धव गटाचे माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

विषबाधा झालेल्या मुलांची नावे
कल्पेश पवार (11), सुमीत सरकार (11), सोमनाथ मूडकट (14), अक्षय मोनिस्वारे (14), अनिकेत राऊत (15), शदाफ कुरेशी (17), परमेश्वर द्मागणे (18)

गेल्याच महिन्यात पंढरपुरात अन्नविषबाधा
पंढरपूरमध्ये गेल्या महिन्यात माघी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त लाखो भाविक जमले होते. अनेक भाविकांनी संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला होता. एकादशीच्या निमित्त उपवास असलेल्या भाविकांनी या मठामध्ये रात्री भगर आणि आमटी खाल्ली होती. तब्बल 137 भाविकांना या अन्नातून विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या सर्व भाविकांना तात्काळ पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा – अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरित करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -