घरमहाराष्ट्रठाकरे गटाला आणखी एक धक्का; 1000 कार्यकर्त्यांसह हा मोठा नेता करणार शिंदे...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; 1000 कार्यकर्त्यांसह हा मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतून शिंदे गट बाजूला झाल्यापासून ठाकरे गटाला गळती सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेचे अनेक आमदार आता त्यांच्यासोबत जात आहेत. शिंदे गटात एक- एक करून ठाकरे गटातील नेत्यांची इन्कमिंग सुरु आहे. यात आता पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटात मोठी खिंडार पडणार असल्याचे दिसून येत आहे. भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांच्यासह 1000 हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अलीकडेच ठाकरे गटातील ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होचत आहेत. यात आता पिंपरी चिंचवडमध्येही शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. शिवसेनेचे कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

- Advertisement -

सोमवारी आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. इरफान सय्यद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मोठे कामगार नेते आहे. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने ठाकरे गटात मोठी खिंड्डर पडणार आहे. दरम्यान आज दुपारी 1 वाजता अभिनेत्री दीपाली सय्यदही शिंदे गटात प्रवेश करणार आहे.


हेही वाचा : रत्नागिरीच्या लोटे MIDC तील कंपनीत भीषण स्फोट; पाच कामगार होरपळले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -