Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoronaVirus - हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या महिलेवर बहिष्कार!

CoronaVirus – हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या महिलेवर बहिष्कार!

Subscribe

सोलापूरमध्ये स्वयंसेविकेला अमानवी वागणूक

घराघरात जाऊन कोरोनाचे सर्वेक्षण करणाऱ्या, आरोग्याची काळजी घेणाऱ्या एका स्वयंसेविकेला अमानवी वागणूक मिळाली आहे. या स्वयंसेविकेला सध्या खोकल्यासाठी हातावर विलगीकरणाचा शिक्का मारला होता. हा शिक्काबघून तीला आणि तीच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. अखेर या स्वयंसेविकेला कुटुंबीयांसह प्रशासनाने एका तात्पुरत्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

महिलेला लावलं हुसकावून

ही महिला शहरातील न्यू बुधवार पेठेत पती व दोन मुलांबरोबर रहात होती. यावेळी तीला घशाचा संसर्ग झाला. तिने शासकीय रुग्णालयात जात उपचार घेतले. खबरदारी म्हणून तिला १४ दिवस ‘होम क्वोरंटीन’ चा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या हातावर शिक्काही मारला. तिचा हा शिक्का शेजारच्या काही महिलांनी पाहिल्यावर करोना झाल्याचा संशय घेत परिसरातील नागरिकांनी तिला दुसरीकडे जायला सांगितले. ती महिला आपल्या माहेरी गेली. परंतु तिथेही तिला विरोध झाला. यानंतर तिने तुळजापूर वेशीत  मावशीचे घर गाठले.  तिथूनही तिला हुसकावले गेले.

स्वयंसेविका संघटनेचा आश्रय

- Advertisement -

अखेर ही महिला पोलिसांकडे गेली मात्र पोलिसांनीही तीला मदत केली नाही. पोलिसांनी तीला शासकीय रूग्णालयात जाण्यास सांगितले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने आशा स्वयंसेविका संघटनेच्या नेत्यांशी  संपर्क साधून मदत मागितली. सध्या ती एका तात्पुरत्या निवारा केंद्रात रहात आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -