Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईतील वर्सोवा भागात इमारतीचा भाग कोसळला, ५ जण जखमी

मुंबईतील वर्सोवा भागात इमारतीचा भाग कोसळला, ५ जण जखमी

Subscribe

अंधेरी (पश्चिम), वर्सोवा, यारी रोड येथील मदिना मस्जिदीसमोरील सिल्व्हर स्ट्रेक अपार्टमेंट या सात मजली इमारतीचा भाग असलेल्या दोन मजली बांधकामाच्या ओपन गॅलरी टेरेसचा काही भाग (सज्जा) आज सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत १६ ते २३ वयोगटातील तीन मुली आणि एक दोन मुले असे पाच जण जखमी झाले. या पाच जखमींवर कूपर व अंजुमन या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा, यारी रोड येथील मदिना मस्जिदीसमोरील तळमजला अधिक सात मजली सिल्व्हर स्ट्रेक अपार्टमेंट या इमारतीचा भाग असलेल्या स्वतंत्र दुमजली बांधकामाअंतर्गत उभारलेल्या ओपन गॅलरी टेरेसचा काही भाग गुरुवारी सायंकाळी २.१५ वाजताच्या सुमारास अचानकपणे कोसळला. या दुर्घटनेत नंदिनी सरवदे (१६ /मुलगी), दीपांजली आरोळे (१६/मुलगी), सोफिया खान ( मुलगी/१७), शौकत अन्सारी( २३) आणि अमन शाहू (२३) हे पाच जण कमी-अधिक प्रमाणात जखमी झाले.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर पाच जखमींपैकी, नंदिनी, दिपांजली व सोफिया या तिघींना नजीकच्या कूपर रुग्णालयात तर शौकत व अमन या दोघांना अंजुमन रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले. या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा : शरद पवारांचा राजीनामा मागे, भाषण जसच्या तसं..


- Advertisement -

 

- Advertisment -