घरताज्या घडामोडीनाशिकच्या संवेदनशील डीआरडीओ परिसरात ड्रोन दिसल्याने खळबळ, आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकच्या संवेदनशील डीआरडीओ परिसरात ड्रोन दिसल्याने खळबळ, आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Subscribe

नाशिकच्या संवेदनशील डीआरडीओ परिसरात ड्रोन दिसल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नववा मैल परिसरात संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच (डीआरडीओ) यांचे कार्यालय आहे. या परिसरात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात ड्रोन उडताना दिसला. काही क्षणात हा ड्रोन तिथे उडल्यानंतर निघून गेला. परंतु या प्रकरणी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आडगाव पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीआरडीओच्या कार्यालयापासून काही किमीच्या अंतरावर एचएएल आणि ओझर विमानतळाचे क्षेत्र आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि एटीबीला पोलीस आयुक्तालयाने तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्ये ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे. महिन्याभरपूर्वीच गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल परिसरात रात्री दहा वाजेच्या सुमारास ड्रोन उडविला गेला होता. स्कुलच्या ‘ट्राफिक कंट्रोल’ रुममध्ये हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी उपनगर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध सैनिकी क्षेत्रात ड्रोन उडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेचा शोध लागलेला नसतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे. या घटनेचा पोलीस शोध घेत आहेत.

ड्रोन उडवण्यासाठी नियम आणि अटी काय ?

- Advertisement -

तुम्ही लायसन्स आणि परवानगी मिळवण्यात यशस्वी झालात तरी देखील ड्रोन उडवण्यासाठी काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. यामध्ये पहिली अट म्हणजे बंधी घातलेल्या ठिकाणी तुम्ही ड्रोन उडवू शकत नाही. याव्यतिरिक्त ड्रोन उडवण्याची उंची आणि वेग यांचे देखील नियम आहेत. ते ड्रोनच्या प्रकारावर अंवलबून आहेत.


हेही वाचा : ठाण्यात उद्यापासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -