घरताज्या घडामोडीदेशविरोधी विधाने करणार्‍या 4 मौलवींविरोधात गुन्हा दाखल

देशविरोधी विधाने करणार्‍या 4 मौलवींविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

धार्मिक भावना दुखाविल्याचाही आरोप

विशिष्ट धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून देशविरोधी वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी उत्तरप्रदेश, हैद्राबाद, चेन्नई आणि जम्मू-काश्मीरच्या चार मौलवींविरुद्ध जे. जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मौलाना अख्तर अब्बास जोन (लखनऊ), मौलाना तकवीर रजा आबिदी (हैदराबाद), मौलाना गुलाम मोहम्मद मेहंदी (चेन्नई) आणि मौलाना गुलाम हसन मट्टू (श्रीनगर) अशी या चार मौलवींची नावे असून लवकरच या चौघांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

इरफान अली सय्यद हे हजरत अब्बा स्ट्रिट, आक्शा मेंशन अपार्टमेंटमध्ये राहतात. 18 ऑक्टोबरला सिया उलेमा असेंबली इंडिया आणि मज्जिद ए इराणिया मोगेल मशिदीच्या विश्वस्तांनी कमी मसले हाल आणि हिकमत अमिल या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सप्टेंबर 2022 रोजी मौलाना अख्तर अब्बास जॉन यांनी मुस्लिम धर्मातील शिया पंथातील लोकांच्या मातंग करण्याच्या प्रथेवर टीका केली होती. या टिकेनंतर त्यांनी पाकिस्तानी मौलवी झोनचे समर्थन करताना शिया धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. अशा प्रकारे मौलाना तकवीर रजा अबिदी, मौलाना गुलाम मोहम्मद मोहम्मद मेहंदी, मौलाना गुलाम हसन मट्टू यांनीही शिया धर्मियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

- Advertisement -

या मौलांनाकडून वारंवार अशा प्रकारे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य येत असल्याने त्याच्या धर्मियांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच त्यांनी भारतविरोधी वक्तव्य करुन विविध धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या कृत्यांमध्ये समाजामध्ये मुस्लिम समाजाबाबत गैरसमज पसरविला जात असून अशांतता पसरविला जात होता. त्यामुळे इरफान अली सय्यद यांनी जे. जे मार्ग पोलिसात या चारही मौलांनाविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांच्याविरुद्ध 153 अ, 153 ब, 295 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.


हेही वाचा : अंधेरी पूर्वसाठी उद्या मतदान, भाजपाची माघार पण सात उमेदवार रिंगणात, कोण मारणार बाजी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -