घरमहाराष्ट्रपुणेश्याम मानव यांच्या धमकीप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्याम मानव यांच्या धमकीप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Subscribe

पुणे – बागेश्वर धामचे पदाधिपती धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांना आव्हान केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाली होती. याप्रकरणी त्यांच्या मुलाने आज हिंजवडीत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासकार्य सुरू करण्यात आले आहे.

श्याम मानव यांना २१ आणि २२ जानेवारी रोजी व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज आले होते. श्याम मानव यांच्या युट्यूबचे काम क्षितिज यामिनी श्याम हे पाहतात. त्यामुळे संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. याच नंबरवर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. क्षितिज पुण्यातील बावधन परिसरात राहत असून धमकी मिळाली तेव्हा ते घरीच होते. त्यामुळे पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात दोन दिवस राम कथेचा दिव्य दरबार झाला. यादरम्यान अंनिसचे श्याम मानव यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं. दिव्य शक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते. तसंच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला होता. त्यानंतर आता श्याम मानव यांना धमकीचे मेसेज येऊ लागले.

- Advertisement -

“उद्या दुपारपर्यंत तुमची गोळी घालून हत्या करण्यात येईल, तुम्ही शांत बसा”, अशा आशयाचा संदेश मोबाइलवर आला होता. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली. श्याम मानव यांना यापूर्वीही सुरक्षा देण्यात आली होती, मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. यापूर्वी श्याम मानव यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे २ जवान तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. पण आता त्याच्यासोबत २ SPU जवान, दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक आणि ३ पोलिसही उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच आता त्याच्या संरक्षणात ४ बंदूकधारी सुरक्षा रक्षक असतील.
श्याम मानव हे गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर येथील शासकीय निवासस्थानी रविभवन येथे वास्तव्यास आहेत. श्याम मानव यांच्या नागपूर येथील घराची देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की, “बाबांकडे सिद्धी नाही. जनतेच्या भावनांशी ते खेळत आहेत. बाबा ढोंगीपणा निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी नागपुरात त्यांच्या मंचावर येऊन चमत्कार दाखवावे, असे आव्हान दिले. त्यांनी असे केल्यास तर आम्ही अंनिसचं काम कायमचं बंद करु, असं देखील श्याम मानव म्हणाले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -