घरमहाराष्ट्रआषाढी एकादशी: शरद पवार नास्तिक, पण 'तो' किस्सा मात्र चर्चेत

आषाढी एकादशी: शरद पवार नास्तिक, पण ‘तो’ किस्सा मात्र चर्चेत

Subscribe

लाखो भक्तगण आषाढी वारीसाठी कित्येक दिवस पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या(pandharpur) दिशेने जात असतात. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक किस्सा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

आषाढी एकादशी(ashadhi ekdashi) म्हणजे वारकऱ्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठीच एक आनंदाचा सोहळा असतो. लाखो भक्तगण आषाढी वारीसाठी कित्येक दिवस पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या(pandharpur) दिशेने जात असतात. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक किस्सा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

हे ही वाचा – बीडच्या नवले दाम्पत्याला मिळाला विठुरायाच्या पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान

- Advertisement -

शरद पवार नास्तिक आहेत असे समजले जाते. पण त्यातही महत्वाचा मुद्दा असा की शरद पवार हे नेहमी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला पंढरपूरला जातात, पण ते कधीच विठ्ठलाचं दर्शन(vitthal mandir) घ्यायला मंदिरात जात नाहीत. त्यामुळे त्यामुळे लोकांना असं वाटतं की शरद पवार नास्तिकच आहेत. पण एकदा शरद पवारांना त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी खूपच आग्रह केला तेव्हा फक्त शरद पवार(sharad pawar) त्यांच्या पत्नीच्या आग्रहास्तव विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा प्रतिभा पवार(pratibha pawar) यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा करत होत्या. पण त्यावेळी शरद पवार मंदिराच्या बाहेर बसून आपल्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते. तेव्हा इथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी शरद पवारांना खोचक प्रश्न विचारला की तुम्ही देव मनात नाहीत, तर मग विठ्ठलाच्या पूजेला(vitthal pooja) कसे काय आलात?

हे ही वाचा – ‘राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाला साकडं

- Advertisement -

एवढी वर्ष राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार यावर उत्तर देताना म्हणाले, ”माझ्या महाराष्ट्राची कोट्यवधी जनता पांडुरंगाला देव मानते, त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे.” शरद पवरांनी हजरजबाबीपणे दिलेल्या उत्तराने त्याचा भाजूला बसलेले सगळेच शांत झाले तसेच, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक आहेत, ते देव मनात नाहीत तर देवळात हात जोडताना सुद्धा कधी शरद पवारांचा फोटो सापडणार नाहीत. असं म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्या नंतर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतानाचे आणि पूजा करतानाचे फोटो शुद्ध व्हायरल झाले.

हे ही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -