सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात एकनाथ शिंदेनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार औरंगाबाद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे(cm eknath shinde) महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र दौरा करत राज्यातील विविध भागांना भेट दिली. नुकतंच एकनाथ शिंदेनी औरंगाबाद जिल्ह्याचा सुद्धा दौरा केला होता. शिवसेनेच्या(shivsena) बंडखोर आमदारांच्या मतदार संघात एकनाथ शिंदेनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार औरंगाबाद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा – ‘त्यांनी’ विचार करावा की, काय करून बसलोय; केदार दिघेंची मुख्यमंत्री शिंदेवर टीका

eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या(maharashtra) विविध भागात दौरा करत विकास कामांचा शुभारंभ करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी औरंगाबाद मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रात्री १० नंतरही लाऊड स्पीकर वरून भाषण केलं होतं. आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात या संबधी तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळेच आनंद कस्तुरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे.

हे ही वाचा –  बाळासाहेबांच्या योजना पुढे नेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) जेव्हा औजारंगाबाद जिल्यात(aunrangabad) दौऱ्यावर आले होते तेव्हा औरंगाबाद मध्ये रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु असायचे, आणि हे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा विरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंद कस्तुरे यांनी केली आहे. मुख्यनामंत्री शिंदे यांनी औरंगाबाद, पैठण, वैजापूर आणि सिल्लोड माध्याही सभा घेतल्या.

हे ही वाचा –  मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नयेत, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी – अजित पवार