घरमहाराष्ट्रधक्कादायक: लेडी सिंघम IPS च्या नावाने देशभरातील अनेक अधिका-यांना गंडा

धक्कादायक: लेडी सिंघम IPS च्या नावाने देशभरातील अनेक अधिका-यांना गंडा

Subscribe

आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्वीटरवर बनावट खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरुन सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिका-यांसह अनेकांकडून पैसे उकळळे असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोशल मीडियावर बनावट खाती तयार करुन पैसे उकळण्याचे अनेक प्रकार मागच्या काही वर्षांत समोर येत आहेत. आता मात्र चक्क लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्वीटरवर बनावट खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरुन सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिका-यांसह अनेकांकडून पैसे उकळळे असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका सायबर भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्वीटरवर बनावट अकाऊंट उघडले होते. त्यानंतर या बनावट खात्यावरुन सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपचार सुरु असलेल्या मुलीसह एका महिलेला फोटो आणि क्यूआर कोड ट्वीट करुन व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेक पैसे पाठवून मदत केली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग,ग्रामाण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्वीटरला कळवले आहे. अनेक ठिकाणांवरुन ट्वीटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच, या भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

‘असे’उकळले पैसे

भामट्याने आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील असल्याचे भासवत, अनेक आयपीएस अधिका-यांना मेसेज केले. त्यात त्याने गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठीचे मेसेज केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये मोक्षदा पाटील असल्याचे भासवत त्य़ाने विश्वास संपादन केला आणि फोन पे च्या माध्यमातून पैसे मागवले. यामध्ये ऑनलाईन भामट्याने मदतीच्या नावाखाली केलेली लूट पाहून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्याच नावाने लूट करण्याचे धाडस कोणी केले याबाबत सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: एप्रिल महिन्यात होणार ‘हे’ मोठे बदल: सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर )

मोक्षदा पाटील कोण आहेत?

IPS मोक्षदा पाटील यांची राज्यात लेडी सिंघम म्हणून ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या ठिकाणी त्यांच्या कामाची चर्चा असते. त्यांचे पती आस्तिककुमार पांडेय हेदेखील आयएएस अधिकारी असून, ते सध्या छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -