Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीराज्य नाट्य स्पर्धेत २८ नाटकांची मेजवानी; २७ नोव्हेंबरपासून पसा नाट्यगृहात दररोज होणार...

राज्य नाट्य स्पर्धेत २८ नाटकांची मेजवानी; २७ नोव्हेंबरपासून पसा नाट्यगृहात दररोज होणार सादरीकरण

Subscribe

नाशिक। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे ६३ वी महाराष्ट्रव्यापी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धाचे नाशिक केंद्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबरपासून सायंकाळी ७ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे सादरीकरण होणार असून, नाशिक केंद्रामध्ये तब्बल 28 नाटकांची मेजवानी नाशिककरांना लाभणार आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात २७ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार असून, त्यानंतर सायंकाळी ७ वाजता प्रयोग सादर होणार आहे. यंदाच्या वर्षी नाशिक केंद्रात 28 नाटकांचे सादरीकरण होणार असून, दि. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती स्पर्धाप्रमुख राजेश जाधव यांनी दिली. (A feast of 28 plays at the State Drama Competition)

स्पर्धेतील नाटके अशी :

२७ नोव्हेंबर : नाटक संध्याछाया (अंबिका चौंक सेवाभावी संस्था, नाशिक), २८ नोव्हेंबर : भरचौकात गांधी पुतळ्यासमोर (सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज, नाशिक), २९ नोव्हेंबरः महाशून्य (सोलस्तीस टेक्नोलॉजी, नाशिक), ३० नोव्हेंबर : पिंडकौल जिल्हा अहिर सुवर्णकार हरिओम सांस्कृतिक (नाशिक समाज संस्था, नाशिक), १ डिसेंबर : चेहरा-मोहरा कलाविष्कार संस्था, (नम्रता नाशिक), २ डिसेंबर : दिल्लीची किल्ली (कविवर्य नारायण सुर्वे नाशिका, ३ डिसेंबर : कर्म ( मनकामेश्वर मराठा फाउंडेशन, नाशिक), ४ डिसेंबर : फुल्ली (मानवता बहुद्देशीय विकास संस्था, नाशिक), ५ डिसेंबर : वो फिर नहीं आते…(मथुरा विकास मंडळ, नाशिक) ६ डिसेंबर : तीन दिवसांची पाहुणी (स्मिता हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक), ७ डिसेंबर : लॉटरी (लोकमंगल कलाविष्कार संस्था, नाशिक), ८ डिसेंबर : आवर्तन (लोकहितवादी मंडळ, नाशिक), ९ डिसेंबर : राहिले दूर घर माझे (क्रांतिवीर कला, क्रीडा मंडळ, नाशिक), १० डिसेंबर : द थर्टिन्थ अमेंडमेंट (मायको एम्प्लॉइज फोरम, नाशिक), ११ डिसेंबर : विनाशकाले (इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक), १२ डिसेंबर : गौतमी (हस्तलेख्यम मॅन्युस्क्रीप्ट, नाशिक), १३ डिसेंबर : अकल्पित (एचएईडब्ल्यूआरसी, रंगशाखा, ओझर), १४ डिसेंबर: मी आणि माझी कला (गोएसो, नाशिक), १५ डिसेंबर : सशक्त (जी. एम. जाधव फाउंडेशन, नाशिक), १६ डिसेंबर: स्पायडरमॅन (दीपक मंडळ, नाशिक), १७ डिसेंबर : ऐश्वर्या ब्यूटीपार्लर (भडक दरवाजा सेवाभावी संस्था, नाशिक), १८ डिसेंबर : जा खेळायला पळ (बाबाज् थिएटर्स, नाशिक), १९ डिसेंबर : पूर्णविराम (अथर्व ड्रामाटिक्स अकादमी, नाशिक), २० डिसेंबर : पगला घोडा (अश्वमेध थिएटर्स), २१ डिसेंबर : सेलिब्रिटी (अर्थनीती फाउंडेशन, नाशिक), २२ डिसेंबर : त्याने आईचं ऐकले (अमृततुल्य जीवन सामाजिक संस्था, नाशिक), २३ डिसेंबर : तन माजोरी (सुरभि थिएटर, नाशिक), २४ डिसेंबर : बिल्वपत्र (अभिरंग बालकला संस्था, नाशिक).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -