Homeक्राइमPune Accident : बर्थडे पार्टीसाठी पुणे गाठलं, दारु पिऊन टल्ली झाला आणि...

Pune Accident : बर्थडे पार्टीसाठी पुणे गाठलं, दारु पिऊन टल्ली झाला आणि विद्यार्थ्यानं महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं

Subscribe

पोर्शे अपघाताला सहा महिने पूर्ण झाले असले तरी आजही या अपघाताची चर्चा होताना दिसते. अशातच पुण्यात पुन्हा एकदा अपघाताची माहिती समोर येत आहे. रविवारी (08 डिसेंबर) रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान विद्यर्थ्याने उडवल्याची घटना घडली आहे.

पुणे : पोर्शे अपघाताला सहा महिने पूर्ण झाले असले तरी आजही या अपघाताची चर्चा होताना दिसते. अशातच पुण्यात पुन्हा एकदा अपघाताची माहिती समोर येत आहे. रविवारी (08 डिसेंबर) रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान विद्यर्थ्याने उडवल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी कारने नाकाबंदीवर तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. तसेच घटनास्थळीवरून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. (A female police officer was hit by a speeding car during a blockade in Pune)

अपघाताची माहिती देताना पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी सांगितले की, आरोपी अर्णव सिंघल हा पुण्यात फिरण्यासाठी आला होता. तो आणि त्याचे काही मित्र रविवारी कार घेऊन फिरत होते.  यावेळी कोरेगाव पार्क परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीची कार थांबवण्यााच प्रयत्न केला. मात्र अर्णव सिंघल याने कार न थांबवता ट्रिपल बॅरिकेटला धडक दिली. यावेळी त्याने ड्युटीवर उभ्या असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला धडक दिली आणि पन्नास ते साठ मीटरपर्यंत फरपटत नेले आणि तिथून पळ काढला. या अपघातात महिला कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली आहे. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करून आम्ही तपास सुरू केला.

हेही वाचा – Atul Subhash Suicide : अतुल सुभाषचे वकील म्हणतात, आदेश चुकीचा असला तरी…

कार ज्या दिशेने गेली होती, तेथील रस्त्यावरील, सोसायटीचे आणि हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री आम्हाला कार सापडली. मालाकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कार भाड्याने दिल्याचे समजले. यानंतर अधिक चौकशी केली असकता संबंधित आरोपी हा खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडला. तो आणि त्याचा अजून एक मित्र दिल्लीवरून पुण्यात आले होते. त्यांचे इतर दोन मित्र हे पुण्यात वास्तव्यास आहेत. हे चौघेजण त्या दिवशी रात्री कोरोगाव पार्कमध्ये गेले होते आणि तिथून परत येताना त्यांनी अपघात केला. या प्रकरणी अर्णव सिंघल याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्मर्तना पाटील यांनी दिली.

हेही वाचा – Satish Wagh Murder : शेजाऱ्यानेच दिली आमदाराच्या मामाची सुपारी, हत्येप्रकरणी पुणे पोलिसांकडून धक्कादायक खुलासा


Edited By Rohit Patil