घरमहाराष्ट्रमुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण...; शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका

मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…; शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका

Subscribe

दिवाळी आली फुसका बार आला आणि वाजलाच नाही. सर्व कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आवाज होता त्यांना यु टर्न घ्यायला लागला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुंबई: मुंब्रा प्रकरणात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मोर्चा उघडला. त्यांनी कालच्या घटनाक्रमावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिवाळी आली फुसका बार आला आणि वाजलाच नाही. सर्व कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आवाज होता त्यांना यु टर्न घ्यायला लागला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माज उतरवणाऱ्यांना सातव्या नंबरवर पाठवलं. उद्या दहाव्या नंबरवरही जातील. लोकं त्यांना कामातून उत्तर देतील, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केला. शनिवारी मुंब्रामधील शाखा पाडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांनी आज या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. (A few bars have come and gone in Mumbra, but Eknath Shinde s criticism of Uddhav  Thackeray)

शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की फुसके बार पळून गेले

सध्या ठाण्यात दिवाळीपूर्वीच आतषबाजी सुरू झाली असून, शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केला.

- Advertisement -

दिवाळीच्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या सर्वस्पर्थी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आपले सणदेखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा सर्वांची आहे, हे लक्षात ठेवून सण साजरा करुया. शिवछत्रपतींचा, जिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हे तर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करत आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: आजच्या समाजाची अवस्था रामायणातील बेडकासारखी…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -