Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोल्हापुरातील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

कोल्हापुरातील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Subscribe

कोल्हापूर (Kolhapur) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) एका इमारतीला भीषण आग लागली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) एका इमारतीला भीषण आग लागली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून आगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (A fire breaks out at a building in Kolhapur 8 vehicles of fire brigade reached the spot)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील इमारतीखाली असलेल्या दुकानाला आग लागली. या आगीतील जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

याशिवाय, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ज्या इमारतीच्या दुकानाला आग लागली आहे, ती आग आता शेजारी असलेल्या घरावर पसरत चालली आहे. आग लागलेल्या इमारतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यामुळे आग पसरल्यास नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

सध्यस्थितीत घटनास्थळी स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आगीच अधिक माहिती घेतली जात आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आगीचा तपास करत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – मध्य रेल्वे मान्सूनसाठी सज्ज; पावसाळ्यात भायखळा, परळ, दादरसह 24 धोक्याच्या ठिकाणांवर ‘या’ उपाययोजना करणार

- Advertisment -