घरमहाराष्ट्रनाशिकनवीन नाशिकमध्ये भंगार दुकानाला आग, पंचवीस ते तीस दुकाने भस्मसात झाल्याचा अंदाज

नवीन नाशिकमध्ये भंगार दुकानाला आग, पंचवीस ते तीस दुकाने भस्मसात झाल्याचा अंदाज

Subscribe

नवीन नाशिक : चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेजवळील भंगार दुकानाला पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीमुळे सिलिंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रात ठराव मंजूर, भारतासह 32 देश राहिले दूर

- Advertisement -

कचरा वेचून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबांना या अग्नितांडवाचा फटका बसला असून सर्वांचे संसार उघड्यावर आले आहेत. आगीची माहिती मिळताच नावीन नाशिक, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहीचल्या. भंगारात रबर, टायर व प्लास्टिक इत्यादी सामग्रीचा समावेश मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने भीषण रूप धारण केले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला खूप प्रयत्न करावे लागले.

दोनच दिवसांपूर्वी धारावीत अग्नितांडव
धारावी येथे शाहू नगर परिसरात कमला नगरमधील काही घरांना बुधवारी (22 फेब्रुवारी 2023) पहाटे 4 च्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये 25पेक्षा अधिक घरे जाळून राख झाली असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 20 ते 25 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत जीविताहिनी झाली नाही.

- Advertisement -

या घटनेपाठोपाठ ठाण्यातही आगीची घटना घडली. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका या ठिकाणी श्री साई प्युअर व्हेज या एक मजली हॉटेलला बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. ही आग जवळपास सव्वा तासांनी पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमुळे हॉटेल्समध्ये अडकलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणाच्या हाताला, कोणाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.

हेही वाचा – पुण्यातील मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या विरोधात; ५० पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -