घरमहाराष्ट्रपुणेजेपी नड्डा गणपतीची आरती करत असताना लागली आग, सुदैवाने हानी टळली

जेपी नड्डा गणपतीची आरती करत असताना लागली आग, सुदैवाने हानी टळली

Subscribe

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी दाखल झाले. मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली.

पुणे : सध्या देशभर गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवात राजकीय नेतेसुद्धा सहभागी होत असून, ते विविध मंडळाना भेटी देत आहे. याच दरम्यान पुणे दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे गणपतीची आरतीत मग्न असताना त्या मंडपाला आग लागली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र, उपस्थितांची धावपळ झाली. हा सगळा प्रकार मंगळवारी दुपारी पुण्यात घडला. (A fire broke out while JP Nadda was performing Ganapati fortunately no damage was avoided)

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी दाखल झाले. मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली. देखाव्याच्या कळसाला आग लागल्याने जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर जावे लागले. याचदरम्यान पाऊस सुरु असल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

आग लागल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करीत असतानाच आग लागल्याची घटना घडली. यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना गणेश मंडपातून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला हृदयविकाराचा झटका; मुंबईतील रुग्णालयात उपाचार सुरू

घटनेनंतर नड्डा कोथरुडच्या दिशेने रवाना

आग लागल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी नड्डा यांना त्या घटनास्थळावरून बाहेर काढले. बाहेर पडल्यानंतर जेपी नड्डा हे कोथरूडच्या दिशेने रवाना झाले. कोथरूडमध्ये ते काही गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. याआधी त्यांनी पुण्यातील अनेक गणेश मंडळाना भेटी दिल्या, गणेश मंडळाच्या आरतीतही ते सहभागी झाले होते.

हेही वाचा : कामानिमित्त मंत्रालयात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; गृह विभागाकडून कठोर नियमावली जारी

आधी मुंबई नंतर पुणे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते आज सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथमतः लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर नड्डांनी फडणवीसांच्या शासकीय निवसस्थानी गणरायचं दर्शन घेतलं. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक तयारीबाबत जेपी नड्डा यांनी बैठकीतून आढावा घेतला. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्यात पोहोचल्यानंतर नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाला हजेरी लावून ते पुन्हा दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -