घरताज्या घडामोडीअवघ्या पाच तासांच्या बाळाने गिळली सोन्याची अंगठी अन् मग...

अवघ्या पाच तासांच्या बाळाने गिळली सोन्याची अंगठी अन् मग…

Subscribe

पुण्यात अवघ्या पाच तासांच्या अर्भकाने सोन्याची अंगठी गिळल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मुलं जन्मला आल्याच्या आनंदाच्या वातावरणात अचानक चिंता पसरली. अंगठी अनेक ठिकाणी शोधली. पण ती कुठे मिळाली नाही. पण जेव्हा बाळाची क्ष किरण तपासणी करण्यात आली. तेव्हा बाळाच्या पोटात अंगठी आढळून आली. यामुळे गंभीर वातावरण झाले आणि मग नातेवाईकांना अंगठी काढण्यासाठी डॉक्टरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर रात्रीतून बाळाला रुबी हॉल दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर तिथल्या डॉ. किरण धनंजय शिंदे यांनी दुर्बिणीद्वारे बाळाच्या पोटातून अंगठी काढण्याचे ठरवले.

अंगठी कुठे दिसत नाही म्हणून जेव्हा शोधाशोध केली तेव्हा काही तासांच्या अर्भकाने ती अंगठी गिळल्याचे समजले. खूप खळबळ माजली. बाळाच्या पोटातून अंगठी काढण्यासाठी डॉक्टरांचा शोध घेतला. मग पुण्यात रुबी हॉल दवाखान्यात दाखल केले. अंगठीमुळे बाळाच्या जिवाला धोका निर्माण होणार होता. कारण टोकदार अंगठीमुळे बाळाच्या आतड्याला दुखापत होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना विश्वासात घेऊन याची कल्पना दिली. डॉ. कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी केली. मेडिकल ग्रॅस्ट्रो एनटोरोलॉजिस्ट अँड एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉ. किरण यांनी तात्काळ दुर्बिणीद्वारे बाळाच्या पोटातील अंगठी काढण्याचे ठरवले. मग नातेवाईकांच्या परवानगीने डॉ. किरण शिंदे यांनी सर्व कौशल्य पणाला लावून डॉ. नंदिनी लोंढे, तसेच अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बाळाच्या पोटातून अंगठी काढली.

- Advertisement -

हेही वाचा – Covid Vaccination: गर्भवती महिलांचे आजपासून लसीकरण, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार लसीकरणात समावेश


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -